Monday, June 15, 2009

कुछ तो लोग कहेंगे, लोगो का काम है कहना

एकदा एक माणुस साधारण चाळिशीतला अणि त्याचा मुलगा साधारण वय पंधरा- अठरा वर्ष, एका गावातूनदुसऱ्या गावी चालले होतेत्यांच्या बरोबर त्यांचे एक गाढव होते, अशी ही दोघे आपल्या वाटेने छान गप्पा मारतचालले होते
ते एका गावाच्या वेशी पाशी आलेतिथे एक चव्हाट्यावर काही म्हातारी माणसा विड्या फुकत बसली होती, तेत्या दोघांकडे बघून हसायला लागलेत्यातला एक जण दुसऱ्याला म्हणाला "काय म्हणावा या दोघस्नी, गाढवरिकामाच सोडलय अणि बजुना चालत चालली, बसल की नाय एखादा त्या गाढवावर" अणि हसायला लागले... हेत्या दोघांनी ऐकल, मग बाप पोराला म्हणाला की तू बस याच्या वर, पोराने मान डोलावली अणि चढला गाढवावर

दुपारची वेळ होती सूर्य चांगलाच तळपत होता, जाता जाता त्यांना गावात एक नदी लागली म्हणुन थोड़ा पाणीप्यायला म्हणुन दोघे नदी कड़े जायला लागलेतिथे कही बाया कपडे धुवायला आल्या होत्याहे दोघ पाणीप्यायला आलेल्या बघून त्यांच्यात कुजबुज उठली, त्या दोघांच्या कानावर ती यईल एवढ्या जोरात ती चाललीहोतीत्या घोळक्या मधली एक बाई म्हणाली "काय बाबा म्हणायचा या पोरालाएवढा तरण बांड अणि बापालाउन्हातुन चालवतो अणि स्वतः ऐटित या गाढवावर बसलाय"
ते दोघे पाणी प्याले, गाढवालाही पाजले अणि मग पोरगा त्याच्या बापाला म्हणाला, की "आता तुम्ही बसा मीचालतो..."
असेच थोड़ा वेळ चालत असता ते एका चावडी पाशी आले, तिथे काही रिकामी टालकी दुपार जेवण अटपुन पानतम्बाकू खात बसली होती, आडकित्यात सुपारी तोडत तोडत एकाने त्यांच्या कड़े पाहिले... अणि चुक्चुकयालालागलाते पोर-बाप जवळ आल्यावर तो त्याच्या साथीदाराला म्हणाला "काय म्हणावा या बापाला, याचा जीवपण कसा झाला पोराला भर दुपार च्या उन्हात चालवायला" अणि कट कन सुपरीचा तुकडा तोडलादूसरा लगेचपानाला चुना लावता लावता म्हणाला " काय बाबा म्हणायचा या माणसाला, दगडाचा कालीज घेउन आला वाटताजन्माला"
ही वाकया ऐकून बाप हादरलाच, पोरगा पण बापाकडे बघून सांगू इच्छित होता की माझ्या मनात असा काहीनाहीये, पण मग रहावाला नाही म्हणुन बापच नंतर म्हणाला " ये पोरा तू पण बैस याच्यावर"
अणि हळु हळु ते गाढव पुढे सरकू लागला.
पुढे एका देवळा जवळ ते पोचलेतिथे काही मंडळी काही गहन चर्चा करत बसले होतेया दोघांना त्या गाढवावरबसून येताना बघून त्यातून एक जण त्यांनाच म्हणाला की " अरे त्या मुक्या जनावारावर किती अत्याचारकरणार, दोघ दोघ बसून चललासाकाही दाया येते की नाही त्या बिचार्या जनावाराची" हे ऐकून ते बाप-पोर पुन्हा हदारलेचदोघ पटकन खाली उतरले अणि आता काय करायचा, त्या गाढवाला झालेल्या श्रमाच्या परतफ़ेडी खातरत्यांनी ठरवला की ते त्याला उचलून नेणारत्यांनी त्याला उचलले अणि घेउन जायला लागले, बरेच कष्ट पडतहोते, पण तरीही लोकां कडून होणारी कुचबना टालावी म्हणुन ते हे कष्ट घेऊ लागले
थोड़ा वेळ झाला गाव कधीच मागे पडला होत त्यांच गाव आता थोड्याच अंतरावर होत, दुपारचा सूर्य पश्चिमे कड़ेझुकयाला लागला होता, अणि शेतावारून कष्ट करून घरी परताणार्या कही शेताकर्यान्नी त्यांना पहिला
ते हसून हसून लोट पोट झालेत्या बापने त्यांना विचारले काय झाला म्हणुन तर एक जण म्हणाला "अर त्यालास्वताहाचे चार पाय असुनही तुम्ही त्याला कशाला उचलला आहेत्यों चालेल की सोताच्या पायांनी"
आता मात्र फार झालेदोघांनी त्या गाढवाला खली ठेवले अणि गप गुमान चालू लागले

कोणी तरी म्हणुन गेलेच आहे म्हणा " ऐकावे जनाचे अणि करावे मनाचे"

आपलाच,
~सभ्तर्ष~


3 comments:

  1. very nice story ... !!

    ReplyDelete
  2. त्यों चालेल की सोताच्या पायांनी - bhaari .. laayi avadla aplyala !!

    ReplyDelete
  3. Sahi na , mastach ahe...
    sabtharshasaar

    " ऐकावे जनाचे अणि करावे मनाचे"

    ReplyDelete