Friday, August 29, 2008

सुख म्हणजे नक्की काय असते ??

मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असते,
काय पुण्य असल की ते घर बसल्या मिलते?

खर तर आज काल हे खुप जास्त वाजायला लागला आहे डोक्यात, म्हटल तर किती सोपा प्रश्न आहे हा अणि म्हटल तर किती गूढ़ अणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे,
सारखा डोक्यात वाजणयाचे कारण की नेहमी अजू बाजु ला जे घडत आहे त्यातून रोज काहीतरी नविन, वेगळ अणि अजब असा शिकतोय,
काय आहे हे सुख, पैसा नाही ( इंग्लिश मधे म्हणतात तसा "learnt it the hard way" )
लहान पणी आजी म्हणायची त्याचा अर्थ आज कळतो आहे किव्वा अजुन कळतोच आहे " बाबा रे आम्ही जेवढ जग पहिले आहे तेवढ अजुन तुम्ही नाही पाहिलेला तर मुला जरा जपून रहा"
कॉलेज मधे असताना असा वाटायचा की पैसा कमावले की संपल आपण सुखी होणार, बास मस्त अभ्यास करायचा, चांगली नोकरी मिळ्वायची, महिन्याला पगाराची १/३ रक्कम सेव करायची, मस्त २-३ वर्षात एखादा फ्लैट मग लग्न करायचा विचार करायचा अणि जमलच तर लग्न करायच अणि घरात सग्ळ्यंनी सुखात राहायचा, बास हाय काय अणि नाय काय,
पण जसा जसा या जगात मोठा होत गेलोय तसा फाइनेंस हा प्रॉब्लम सोडला तर बाकी कोणताही प्रॉब्लम अजुन सॉल्व झाला नाहीये, उलट नविन नविन अजब, ज्यांच्या बद्दल कधी विचार ही नसेल केला अशे प्रश्न पुढे येउन ठेपले.
विचार विनिमय केला एक सोलुशंस म्हणजे भारताच्या बाहेर जा अणि मस्त मोठ्या पगाराची नोकरी करा अणि जास्त सेव करा म्हणजे पुण्यात घर घेण्याची ऐपत होइल अणि मग सगळे सुखाने रहा, पण मग हे प्रॉब्लम च सॉल्यूशन न वाटता ताच्या पासून पळुन जाण्याचा मार्ग वाटतो, माहित नाही का,
परत तिकडे जाउन हवि तशी नोकरी मिळेलच याची काय guarantee, चला नोकरी मिळाली तरी career च्या दृष्टीने तिचा कसा उपयोग, इकडे निदान घराच्यां सोबत तरी राहतो आहे.. तिकडे तर ते ही नसणार, रोज कितीही उशिरा घरी गेलो तरी रोज कोणीतरी दरवाजा उघडायला आहे रागाने, चिडून का होइना पण प्रेमाने. तिथे तर तसेही कोणी नसेल. तिकडच्या home sick मित्रांचे अनुभव ऐकले की वाटत की नको बाबा इथेच राहून काय ती चटनी भाकरी मिळाली तर बरे, भले घर व्हायला अजुन १ वर्ष लागु दे पण चालेल पण तो त्रास नको असे अणि याच्या सारख्या विचारांनी डोक भंडावून उठत, अश्या वेळी चा ताण अकल्पनीय वाढतो, अणि आपोआपच ते सॉल्यूशन नकोसा वाटू लागत,
मग आता यातून सॉल्यूशन काय?
आजवर जे पहिल, ऐकल, अनुभवल, शिकल त्यातून हे सॉल्यूशन समोर येते की,
पैश्याच्या मागे धावण्यात काहीच अर्थ नाही, अपाला लॉन्ग टर्म गोल आहे सुखात आनंदात रहावा बास, अजुन काय ?
आपल्या आधीच्या पिढीने घर कधी मिळवले? साधारण वयाच्या तीशित, मग आपण तेवढे patient का नाही, स्वयंपूर्ण होण्याची काय एवढी घाई आहे, अर्थात तसा स्वयंपूर्ण आता अहोताच पण मग तो जो long term goal आहे त्याच्या साठी काय करत आहोत. पैसा हवा नाही असा नाही पण त्याच्या उपयोग हा तो गोल अचीव करण्या साठी व्हावा, बास बाकी काय
आता ते कसा करावा ?
खुप विचार केल्या नंतर या विचारने माझया डोक्यात लक्ख प्रकाश पाडला, अरे वेड्या, तो जो गोल गोल म्हणतो आहेस तो long term नाहीये जो जसा जसा जगत जातोस तसा तसा अचीव होत जातो।
तो जो गोल आहे तो काही कुठला ठिकाण नाही की जिथे गेला की वाटता "हुश्श!! आलो बाबा एकदाचा" पण तो प्रवास आहे जो सुखात अनुभवायचा आहे, २ वर्षा नंतर मला हे हव म्हणुन मी आत्ताचा क्षण का दुखात घालवतो आहे ?

जग मित्रा, आत्ताचा हा क्षण आनंदात जग, जे जे नाही केले ते करा लहान पणी जे जे नाही करता आला ते कर,
खुप सारे खेळ शिकू लागलो, ऑफिस मधे टेबल टेनिस आल्या पासून गेल्या ६ महिन्यात बराच चांगला खेळु लागलो, मग असा वाटल की हो खरच आपण ही खेळु शकतो, हा देह कितीही मोठा वाटत असला तरी कॉलेज मधे गेल्या पासून सुटलेले क्रिकेट वगेरे खेळात अजुनही आपण खेळु शकतो, मग तर विचारूच नका badminton पण सुरु केले, अणि आज पासून तर चक्क २ वर्षा पासून पेंडिंग असा ब्लॉग ही सुरु केले... अब रुकना नाही,
आता म्यूजिक शिकायची इच्छा ही पूर्ण करायची आहे.. जगात जे जे आवडत ते ते करायचा आहे मग ते करायला परदेशाताच जाव असा कही नाही, आपल्या लोकात राहून देखिल हे सगला करता येईल,


हळु हळु का होइना पैसा सेव करावा अणि घर अपोपाप होइल? जे जे हवे आहे ते सर्व करुयात घाई कोणाला आहे,
कष्ट नाही तर जीवनात मजा नाही असा कोणीतरी म्हटला असेलच.

अणि एवढी चांगली मित्र मंडली आहेत, दृष्ट लगाव असा भाऊ आहे, फॅमिली आहे,
बास आहे अजुन काय हवे.. self satisfied म्हणतात ते हेच बहुतेक.

लहानपणी महाभारत सीरियल लगत होती तिची सुरुवात एका शंख नादान होत अणि मग एक मानुस एक श्लोक महनत "कर्मण्ये वादी कारस्तेय, मा फलेषु कदाचना !"
अर्थ आता समजतोय :)

p.s: पहिलाच ब्लॉग लिहिला अणि तो ही मराठीत त्या मूळे चुक भूल देणे घेणे।

~sabhtarsha~