Tuesday, December 21, 2010

दो दीवाने शहर में, ....


आज सकाळी बाइक वरून मी अणि बायको एक ठिकाणी चाललो होतो.. माझ्या पुढे एक बाइक अचानक थोड़ी स्लो झाली.. जरा नीट पाहिले तर अस लक्षात आले .. की एक कावळा उडाता उडाता रस्त्या वर पडलेली एक गोष्ट उचलायला एकदम खाली आला... त्या मुळे पुढचा बाईक वाला एकदम स्लो झाला .. 
तसे कावळे हे जरा लहरी वाटतात.. अणि त्यांचा हे अस रस्त्या मधेच झेप घेणं कही नविन किव्वा वेगळं नाही.. पण मग जेव्हा पुढे जाऊन पहिला की काय आहे ज्या साठी हा एवढा भर रस्त्यात जीव हातात (पंखात) घेउन उडी मरतो आहे.. तर लक्षात आलं... 
तिथे एक गवताची दांडी होती... घरट बांधण्यासाठी केवढा हा आटा पिटा ... असा विचार अचानक आला...
मग वाटला.. आपण काय वेगळं करतो आहोत... तसा फरक कुठे काही आहे???

गुलजारच एक गाणं आठवला....

दो दिवाने शहर मे
रात मे या दोपहर मे
आबुदना धुंडते है
एक आशियाना धुंडते है

इन भूल-भूल्लैया गलीयोन मे
अपना भी कोई घर होगा
अंबर पे खुलेगी खिडकीया
खिडकी पे खुला अंबर होगा...

अस्मानी रंग कि आंखो मे
बसनेका बहाना धुंडते है
आबुदना धुंडते है..
एक आशियाना धुंडते है

जब तारे जमीपर चलते है
आकाश जमी हो जाता है 
उस रात नही फिर घर जाता 
वो चांद यही सो जाता ही

पल भर के लिये इन आंखो मे
हम एक जमाना धुंडते है
आबुदाना धुंडते है
एक आशियाना धुंडते है

चुक भूल, देणे घेणे,

आपलाच,
~सभ्तर्ष~