Thursday, April 30, 2009

एक पल का जीना

आज खुप दिवसांनी infact बर्याच महिन्यांनी लिहावेसे वाटले किव्वा तसा म्हणाल तर बर्याच महिन्यांनी मजला काहि उमगले, तस त्याचे कारणही जेवढा मोठा तेवढच नकोस आहे॥
तर एकुणच झाला अस की आमची आज सकाळी ऑफिस मधे होती एक मीटिंग, आमच्या product च्या chief architect barobar, ती मीच schedule केल्या मुळे मला तिथे वेळेवर जाण भाग होता॥ तसा मी वेळेवर उठून तयार ही झालो अणि घरातून निघालो सुद्धा, अणि साधारण ४-५ km गेलो असेल ते एक ब्रिज बरुन उतरत असताना अचानक खाली पाणी दिसले॥ पण ब्रेक लावण भाग होत कारण पुढे traffic jam होता अणि उतारा वर असल्या मुळे तसा माझा वेग ही जास्तच होता, म्हणुन जरा ब्रेक जरा गियर यांच्या सहयोगाने गाड़ी slow करण्याचा प्रयत्न चालू असतानाच जे व्हायला नको तेच जाला, अणि गाड़ी घसरली। मग मी गाड़ी सोडली (हे मी बर्याच वेळा केला आहे॥ गाड़ी slip झाली की तिच्या बरोबर आपण slip होऊ नये म्हणुन गाड़ी सोडणे हे अनुभवातून शिकलो :P) अणि मी पण त्या पाणीदार रस्त्यावर घसरलो, अणि मग हेलमेट मग बैग (तिच्या मधला लैपटॉप) असा सगळच अदळत असल्याचे जाणवत होते॥ हेलमेट ने मात्र खुप मोठा धक्का सहन केलेला दिसत होता, अजुनही दिसतोयत्याची बिचार्याची काच फुटली, बदलावी लागेल .. अणि मग ट्रैफिक थम्बले॥ माला अणि माझ्या गाडीला उचलण्यात आले॥ काही सत पुरुषान्नि मला रस्त्याच्या कडेला येण्यात मदत केलि, कुठल्याश्या माणसाने माझी गाड़ी बाजूला अणुन लावली, तसा मला कही जास्त लागला नव्हता॥ (thank you to PMC रस्ते इतके चांगले अणि गुळगुळीत केले की घसरत गेलो अणि फ़क्त हाताच्या कोपर्याला अणि गुडघ्याला थोड़े खरचटले॥ अणि काहीसा मुका मार लागला जो माला अत्ता जाणवतोय :P)
तेव्हा माला रस्त्याच्या बाजूला नेणारा एक मानुस म्हणाला "नशीबवान आहात साहेब॥ वाचलात", तसा तेव्हा मला काही कळल नाही॥ कदाचित मागुन मोठी गाड़ी वगौरे येत असावी॥ मी माझ्या कपद्यन कड़े पाहिले , trouser डाव्या गुडघ्यावर फाटली होती चिखल मय पाण्या मुळे ती सौम्य brown ची अधिक गडद brown झाली होती, शर्ट ओला जाला होता, बहुतेक फाटला पण होता॥ गाड़ी कड़े पहिला॥ प्रथम दर्शनी headlight च्या वरची काच अधिक फुटली होती.
आजू बाजू जमलेल्या बर्याच लोकांच्या प्रश्नाची उत्तर दिले की मला काही झालेले नाहीये॥ सगळी हाडे जिथे होती तिथेच अणि तेवढीच आहेत॥ अणि गाड़ी चालू केलि अणि निघालो तेव्हा जाणवला गाड़ी च shock absorber मधे झोल झाला आहे... पुढल्या चौकातून U turn घेतला अणि घरा कड़े निघायला वळालो॥
तेव्हा माझ्या डोक्यात त्या माणसाचे शब्द पडले॥ "नशीबवान आहात साहेब॥ वाचलात" ... वाचलो ?? की अडकलो ? जर कही बर वाईट झाल असता तर ??? गेले १-२ आठवडे जे tensions आहेत ते गेले असते ना ?
घर, लग्न, गाड़ी, मित्र, सुखी आयुष्य॥ काय काय करायचा आहे त्याच्या साठी किती तयारी चालू आहे... savingस करा plannig करा॥ किती ५-१०-१५ वर्षा पुढले investments बघा॥ PF किती PPF काढा.... policy काढा, पेंशन प्लान्स बघा॥ अणि त्याच्या साठी टेंशन घ्या ?
नही पण खरच वाचलो खरया अर्थाने वाचलो,, वाचलो म्हणुनच तर हे कळले
काय राव॥ कोणी संगीतालय "मस्ती में जियो" टेंशन नही लेनेका ॥ काय ठाउक कधी जावा लागेल॥ स्वतः साठी कही तरी करा॥ दूसरो के लिए तो सब जीते है॥ थोड़ा अपने लिए जियो॥
हे अणि असे बरेच साक्षात्कार झाले