Monday, December 01, 2008

ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना....

एक छोटीशी गोष्ट-
लई लई वर्सा अधीची गोष्त हाय बघा. एक आटपाट नावाचा गाव व्हत.
मागल्या वरसी काय जास पाउस न्हाई झाला म्हून लोकास्नी जास पीक न्हाई घेता आल अणि या वारसी तर बगापावसाचा नावच न्हाई... कोन बी काय बी म्हन्हाया लागले. म्हने गावाला शाप लागला हाय म्हून पाण्याचा एकटिपूस पड़ना.
लई बिकट झाली व्हति बघा अवस्था, कोनाला काय बी सूचना, समदे उपाय करून झाले.
कोन नवसच बोलतय, तर कोन गावातले सरपंच अणि मंडली शहरातल्या सहेबाकड़ जाऊन पाण्या साठी कायउपाय व्होतोय का ते बघतायत ... पण काय बी झाल न्हाय बगा. सगळी कड हीच तरा .
समदी पोर-सोर, बाया, बापे समदे पाण्याच्या ओढिन लाम लाम परेंत जाऊन कुठ खाड्डेच खोद तर कुठ झरामिलातोय का बाघ असा करत . समदी जनावर मरायास्नी टेकायला लागली व्हति. काय करावा कुणाला बीउमजना.
सगळी मंडळी अकशाकडं डोळ लाउन बसली व्हति. कधी पडतोय त्यों पाउस अन कधी एकदाची तहान बुजतिये... जिमिन तर तापून तापून करापल्या वाणी झाली व्हति,
एक दिस असाच एक मोठ महाराज गवाकड आले अणि गावानी त्याच्याकादा वल्या डोल्यांन पहायला . या साधूमहाराजांना म्हणे सगला ग्यात हाय, ते सगला जानातात म्हून समदी लोक त्यांना भेतायास्नी गेली. साधू महाराजम्हणाले "जर देवा वर श्रद्दा असेल तर समदी जा , गावा बाहेरच्या टेकडी वर च्या देवाळात जा, तिथे देवाच्या चरनीडोक ठेवा. अणि बघा पाउस पडणारच... "

समदी मंडली खुश झाली. दूसरा दीस उजाडला. समदी टेकडी वर जायला निघाली.
समदा गाव सकाळी जमला. जोतो गडबडीत, समदी पाय वाटेने वर चढाया लागली.
याच गर्दित एक लहान पोर पण त्याच्या छोट्या पावलांनी टेकडी चढत व्हता. त्याच्या एकट्याच्या हातात एक छत्रीव्हति. ती बघून एक घोळख्यातल्या माणसाने त्याला इचाराले.
"काय रे पोरा, ही छत्री घेउन कशाला आलास?"
त्यावर ते पोर म्हनल "आता वल गेल्यावल पाउस येनाल ना, मग मी भिजेल ना!!"
--------------------------

श्रद्धा म्हणजे काय ?