Monday, May 31, 2010

आला आला वारा, संगे पावसाच्या धारा .....


आज खूप दिवसांनी लिहावासा वाटला.. म्हणजे घडलं हि तसच कि लिहावसं वाटला..
मे महिन्याचा शेवटचा दिवस... दिवस भर उकाड्याने हैराण झालेलो असताना संध्याकाळी अचानक ढग दाटून आले..
वाटलं आता मस्त पाऊस पडला पाहिजे ... तेवढ्यात हरया चा पिंग आला .. भूक लागली म्हणे... म्हटला चला
जरा चहा पोहे खावेत.. टपरी वर ....
मस्त पोहे खात होतो आणि मोठे मोठे थेंब बरसू लागले.. आम्ही दोघेहि आकाशा कडे पहिले.. म्हटला बघावा कुठे भोक पडल.....
लवकरच जाईल पाऊस या हिशोबाने आपला हळू हळू चहा पोह्याचा कार्यक्रम उरकू लागलो.. पण नाही नाही म्हणता चांगलाच वाढला..
तेवढ्यात हरी भाऊंची कॉमेंट: उद्या सकाळ मध्ये बातमी.. अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची तारांबळ उडाली...
मग काय बघायलाच नको.. रत्यावर दिसेल त्याच्या/तिच्यावर कॉमेंट मारणं चालू झाला..
लोक आपले सैरा वैरा धावत होते.. बाईक्स आणि स्कुटी वरील नव युवक युवती.. पावसाचा आनंद घेत चिंब भिजून.. फिरत होते..
तेवढ्यात एक लहान पोरांची टोळकी आली.. मे महिन्याचा सुट्ट्या चालू आहेत.. संध्याकाळी क्रिकेट चा टायिम आणि पाऊस आला.. आता करणार काय..
रत्याच्या बाजूने वाहणाऱ्या पाण्यात मस्त उड्या मारत होते.. त्यातीलच एक मुलगा.. त्याच्या पेक्षा छोट्या (वयाने आकाराने नव्हे ) मुलाला : ते बघ.. त्या गाडी चे अर्धे चाक पाण्यात .. त्याला छोट्या मुलाचे उत्तर : आई शप्पत कसलं भारी राव..
हरया आणि मी : हा हा हा हा ..
मग एक कार येते.. टपरी समोर थांबते.. २ डोसा .. अशी ऑर्डर देते..
या वर कॉमेंट हरी भाऊ: आयला, एवढ्या पावसात रत्यावर उभं राहून चहा पिण्याची मजा या कार वाल्यांना नाही येणार..
हरया आणि मी : हा हा हा हा ..
थोड्या वेळाने २ कॉलेज वयीन चिंब भिजलेल्या मुली.. स्कुटी भर रस्त्यात ( त्यांच्या साठी कदाचित ते नवीन नसावा): २ डोसा पार्सल
अशी ओर्देर देऊन गप्पा मारत होत्या.. मागून त्याच्या अजून २ मैत्रिणी आल्या आणि तश्याच रस्त्यावर गप्पा मारत उभ्या राहिल्या..
मागून येणाऱ्या कार ने होर्न वाजवला तेव्हा भानात येऊन.. : अच्चा चाल भेटू उदया
हरया आणि मी : परत हा हा हा हा ...
आत्ता पर्यंत बराच पाऊस पडून झाला होता.. म्हणजे इतका कि आमच्या समोरच्या रस्त्या वर बरच पाणी साठलं होत..
मग एक नाव तरुण त्याच्या जोरात धावण्र्या बाईक वर जरा जोरात आला..समोरून येणाऱ्या रिक्षा मध्ये पाणी उडालं आणि पासिंजर: अरे एsss
करत ओरडला..
हरया आणि मी : हा हा हा हा ...
अजून पण बरेच काही झाला.. बरीच भिजलेली लोकं रस्त्यावरून गेली.. प्रत्तेकावर मारलेले कॉमेंट्स इथे लिहिणं चांगला "दिसणार" नाही..

अश्यातच अर्धा तास गेला.. पाऊस थोडा थोडा कमी झाला. आम्ही हिम्मत करून निघालो.. तर एक कार वाला जोरात गेला आणि जोरात पाणी उडवून गेला..
हरया आणि मी: @!#@!$#@#$ आणि ......परत ...........हा हा हा....
धमाल संध्याकाळ..

बाकी सर्व क्षेम...
चुक भूल देणे घेणे,
आपलाच,
~सभ्तर्ष~