Tuesday, September 30, 2008

ट्रेलर: हा खेळ सावल्यांचा

खुप दिवस झाले काही तरी लिहावस वाटते आहे पण काही केल्या होत नाहीये अणि आज तर वेळ पण आहे पण तरी म्हणाल तस सुचत नाही म्हणुन असच एखादी पोस्ट टाकावी म्हटल बघू काही उतरते का.
एक विषय घुटमळतो आहे डोक्यात
नाव: "हा खेळ सावल्यांचा"...
जर मराठी चित्रपटान बद्दल काही थोड़ा फार ज्ञान असेल तर खुप पूर्वी या नावाचा एक चित्रपट होउन गेला... starring काशीनाथ घाणेकर... "गोमू संगतीने, माझ्या तू येशील का" फेम॥
पण जे मला वाटत आहे ते अणि या चित्रपटा मधे कही साम्य नाहीये .

"सावली म्हणजे एखाद्याच्या डोक्यातील विचार", या अनुशागाने थोड़ा विचार केला (किव्वा थोड़ा सावल्यांचा खेळ केला) तर डोक्यात एक लक्ख प्रकाशाची किरण पड़ते अणि अजुन सावल्या दिसतात (:D)

काही सावल्या आपल्याला चांगल्या, हव्या हव्याश्या असतात तर काही अगदी नकोश्य,
काहींच्या उबदार संगतीत रहवास वाटत तर काहींची संगत पायात मोडलेल्या एखाद्या काट्या प्रमाणे सलत रहाते.
एखाद्या माणसाचे सगळे जीवन या सवाल्यां मधे गुंतून जाते,

आता असा विचार करू की जर या सवाल्याच नाहीश्या झाल्या तर ?
किती गम्मत येईल !! की काय होइल ??
मग, त्या नकोश्यासावल्या पण जातील अणि आवडणारया पण जातील,
हे जो पर्यंत तस होत नाही तो पर्यंत कळणार नाही अणि जर तस झाला तरी कळणार कस ?
काही कळण्या साठी सावल्यांचा आधार हा घ्यावा लागणारच
बापरे कसल गूढ़ कोड आहे,
जर तुम्ही इथ पर्यंत वाचल अणि काही कळाल तर "कमेन्ट" नक्की टाका :)
असो,
ट्रेलर म्हणुन एवढा ठीक आहे आज साठी :)

चुक भूल देणे घेणे,

आपलाच,
~सभ्तर्ष~

Tuesday, September 09, 2008

एका पांढरया घोड्याची गोष्ट

एका इसमा कड़े एक पांढरा शुभ्र असा घोड़ा होता, असे ऐकिवात आहे की तो इतका सुंदर होता की खुद्द रजा सुद्धा त्याला या घोड्या साठी मागेल ती किम्मत द्यायला तैयार होता, पण तो इसम काही केल्या तो घोड़ा द्यायला काही तयार नव्हता. कारण त्याला त्याचा घोडा फार प्रिय होता, त्याला गावातील लोक सुद्धा म्हणायला लागले की बाबा देऊन टाक तो घोडा राजाला, उगाच कशाला त्याच्याशी वैर घेतो, पण तरी तो काही तयार नव्हता, सगळ्या गाववाल्यांची त्याच्या घोडयावर नजर होती. सगळे जळत असत, त्याच्या घोडयाकडे बघून. पण त्याच्या वर याचा काही परिणाम होत नसत, कारण घोड्या वर तो खुप प्रेम करत होता अणि त्याला पैश्या च्या बदल्यात कोणाला द्यावे असा विचार ही करवत नव्हता, तो त्याच्या घोड्याची खुप कळजी घ्यायचा.
असेच एका रात्रि त्याचा घोडा तबेल्यातुन गायब झाला. सकाळी सकाळी सगळे लोक त्याच्या घर जवळ जमले अणि त्याचे सांत्वन करू लागले. त्याला कोणी विचारले तर तो म्हणायचा,
"माझा घोडा माझ्या तबेल्यात नाही एवढेच मला माहित आहे.. आता हे चांगला झाले की वाईट हे मला माहित नाही"
लोक त्याचा या विचारां मूळे कुजबुज करू लागले अणि निघून गेले.
मग थोड्या दिवसांनी एका सकाळी तो घोडा परत आला अणि येताना १० जंगली घोडे घेउन आला, एकदम त्याच्या सारखेच, ही बातमी आख्या गावात वारया सारखी पसरली अणि बरेच लोक त्या घोडयांना बघायला अणि त्या माणसाचे अभिनंदन करायला त्याच्या घरी आले. जेव्हा काहींनी त्याचे अभिनंदन केले तेव्हा तो म्हणाला की
" माझा घोड़ा गेला होता अणि आज सकाळी परत आला अणि येताना १० त्याच्या सारखेच घोडे घेउन आला एवढेच माला माहित आहे .. आता हे चंगले झाले की वाईट मला माहित नाही"
त्याच्या या उदासिनाते बद्दल लोक रागावले अणि निघून गेले ..
त्या माणसाचा एक तरुण मुलगा होता तो आता या १० घोडयांना शिकवायला लागला .. सगळे घोडे चांगले माण्साळु लागले होते.. तेवढ्यात एक अपघात झाला अणि त्यात त्या माणसाचा एकुलता एक मुलगा एका घोड्या वरून पडला अणि त्यात त्याला त्याचे दोन्ही पाय गमवावे लागले. परत काही लोक त्याचे सांत्वन करायला त्याच्या घरी आले, तर तो म्हणायचा की
"माझा मुलगा घोड्यावरून पडला अणि त्याला अपंगत्व आला एवढेच माला माहित .. आता हे चांगले झाले की वाईट हे मला माहित नाही"
हे ऐकून गाव वाले तिथून निघून गेले.
असेच बरेच दिवस उलटून गेले अणि एके दिवस त्याच्या राज्या वर एका युद्धाची सावट पसरली। असे म्हणतात की ते युद्ध नव्हत तर त्यांच्या राजा मूळे राज्या वर आलेले संकट होता . त्या युद्धात ह्यांच्या सैन्यात कोणी वाचणार नव्हते अणि राजाने त्याच्या राज्यातील सर्व तरुण मुलांना बोलावून सैन्यात बळजबरिने भरती करून घेतले होते. म्हणुन बरेच लोक तेथुन पळ काढत होते. फ़क्त लहान मूले, स्तरीय, वृद्ध अणि अपंग लोकांना त्याने कही केले नही.
तेव्हा सगळे सैन्य युद्धात मेले. जेव्हा पण काही लोक त्या इसमाला भेटत तेव्हा म्हणत की तू नशीबवान आहेस म्हणुन तुझा मुलगा वाचला नाहीतर आमचा पूर्ण वन्श बरबात झाला .. तेव्हा तो त्यांना म्हणत की
" माझा मुलगा अपन्गत्वा मूळे युद्धात नाही जाऊ शकला एवढेच मला माहित,
आता हे चांगले झाले की वाईट हे मला माहित नाही".

यातून बरेच काही शिकायला मिळाले .......... :)

"Live in this moment"

~सभ्तर्ष~