Thursday, October 16, 2008

पुरानी जीन्स और गिटार......


पोस्ट च टाइटल वाचून जर कोणाला असा वाटेल की मी गिटार वगेरे वाजवतो तर अस काही नाहीये, मला आवडेल ते वादय शिकायला पण......... असो.
माझ्या मागल्या काही (३) पोस्ट्स च टाइटल साठी योगयोगाने काही गाण्यां मधील ओळी सुचल्या अणि या वेळी तर एक गाण्याने पोस्ट सुचवली आता तसच बघू पुढे किती consistency ठेवता येते आहे ते.
असो...
बाकी पोस्ट बद्दल म्हणाल तर त्याचा अस झाला की माझ्या कड़े माझ्या आवडीच्या २च अश्या जीन्स होत्या अणि त्या सुद्धा एकाच कंपनीच्या (Wrangler) अणि एकाचा स्टाइल च्या, वर्षा च्या वेगवेगळ्या ऋतु मधे घेतलेल्या। काही दिवसांपूर्वी त्यातील एक गुडघ्यावर फाटली. अरेरे... आता झाली का पंचायीत, घरून बर्याच शिव्या ऐकल्या होत्या त्याच त्याच अणि एक सारख्या जीन्स घेतल्या बद्दल अणि त्या शिव्या माझ्या लाडक्या जीन्सला लागल्या अणि बिचारी तीच लाजुन फाटली, :(

या वरच्या गोष्टी वाचल्या तर उगीच कोणाला तरी वाटेल की काय राव जीन्स मधे काय जीव आडकवायचा. पण माझा दुःख त्यालाच कळेल ज्याला व्यवस्थित फिटिंग च्या जीन्स शोधायला वण वण फिराव लागत. म्हणजे मी तसा कही एवढा ओबड़-धोबड़ नाही पण तरी... आहे थोड़ा, आता त्यात हसण्या सारखा जास्त काही नाहीये. म्हणुनच एखादी फिटिंग आवडली की मी त्याच फिटिंग ची अणि कंपनी ची अणि बहुतेक रंगा चीही अजुन १-२ जेंस घेउन टकतो नंतर च्या खरेदी cycle मधे. ( याचे एकमेव कारण म्हणजे त्या दोन्ही एकच जीन्स नसून दोन वेगळ्या जीन्स आहेत हे तिच्या कड़े बघणारयाला, तिला धुणारयाला, तिला धुवायला टाकानारयाल, इस्त्री वाल्याला , अणि महत्वाचे म्हणजे तिला घलणारयाला कळावे म्हणुन, एकाच वेळेस दोन सारख्या घेत नाही)

आता ती जीन्स फाटली अणि त्या category मधली एकच राहिली तर आता अजुन १-२ तश्याच घेतल्या पाहिजेत म्हणुन जरा shopping ची तयारी सुरु केली. तयारी एवढ्या करता म्हणालो कारण कधीतरी कपडे खरेदी करणारे याला खुप मोठा event म्हणुन साजरा करतात अणि नेहमी खरेदी करणारयना विचारतात की बाबा कुठे सेल आहे ? कुठे स्वस्त कपडे आहेत? कुठे variety आहे ??? अणि वगेरे वगेरे.

एवढ्या तयारी नंतर मग शेवटी खरेदी केली अणि मग पुन्हा आपल्या ब्रन्ड ची जीन्स घेतली. किती आनंद झाला म्हणुन सांगू, असो.

मस्त पैकी लगेच काढली पण जीन्स ऑफिस साठी वापरायला. कसला भारी वाटत होत, एकदम कड़क !!
तो दिवस छान गेला. मग दुसरया दिवशी पुन्हा जुनी जीन्स घातली.
कसला भारी वाटते "back to old days" !!! मग असा वाटला चयाला नवी कितीही भारी असो, पण जुनी ती जुनीच . म्हणुनच बहुतेक "पुरानी जीन्स " ला एवढा डिमांड आहेत.
पण हे घरी आई ला कळाल तर नवलच, तिला काय कळणार जुन्या जीन्स च्या प्रति असणारा माझा प्रेम.
म्हणुन म्हटला की आपण त्या फाटक्या जीन्स साठी म्हणुन काही तरी केला पाहिजे.
आज "पुरानी जीन्स" हे गाण एकला अणि एकदम जखम वर आली, आता ठरवलच की आपण एक पोस्ट टाकुयात अणि म्हणुनच हा सगळा खटाटोप . असो ... चालायचच
आता तर मी त्या जीन्स्चे पाय कापून तिला हाफ करुन वापरणार आहे, हिच तिच्या साठी माझ्याकडुन श्रद्धांजलि.

आता यातून काय उमजले म्हणाल तर, एवढेच की
जुने कितीही छान वाटला तरी नवे घेण भाग आहे, हे आजचे नवे कधीतरी जुने होइल अणि पुन्हा नव घ्यावा लागेल... हे असा चालायचच, जूने कधीतरी सोडावा लागणारच फ़क्त ते सोडताना त्याला मस्त पैकी thank you म्हणुन सोडून दया अणि नव्याच्या मागे लागा।
काही गोष्टी अश्याही असतात की ज्या कधीच जुन्या होत नाहीत म्हणुन काय त्यांना कधीच "thank you" म्हणता येणार नाही का ? अस नाही.
असो,

चुक भूल देणे घेणे,

आपलाच,
~सभ्तर्ष~

3 comments:

  1. great thoughts mitra ... !!

    ReplyDelete
  2. mast vichar aani yes, wrangler jeans rock!

    ReplyDelete
  3. "पण माझा दुःख त्यालाच कळेल ज्याला व्यवस्थित फिटिंग च्या जीन्स शोधायला वण वण फिराव लागत."
    hahaha kiti khara boltos re tu...

    Bar aik Lee chya "Strechable" jeans alya ahet...kasahi kiti motha aslas tari tya bastil..try kar ho

    ReplyDelete