Monday, May 31, 2010

आला आला वारा, संगे पावसाच्या धारा .....


आज खूप दिवसांनी लिहावासा वाटला.. म्हणजे घडलं हि तसच कि लिहावसं वाटला..
मे महिन्याचा शेवटचा दिवस... दिवस भर उकाड्याने हैराण झालेलो असताना संध्याकाळी अचानक ढग दाटून आले..
वाटलं आता मस्त पाऊस पडला पाहिजे ... तेवढ्यात हरया चा पिंग आला .. भूक लागली म्हणे... म्हटला चला
जरा चहा पोहे खावेत.. टपरी वर ....
मस्त पोहे खात होतो आणि मोठे मोठे थेंब बरसू लागले.. आम्ही दोघेहि आकाशा कडे पहिले.. म्हटला बघावा कुठे भोक पडल.....
लवकरच जाईल पाऊस या हिशोबाने आपला हळू हळू चहा पोह्याचा कार्यक्रम उरकू लागलो.. पण नाही नाही म्हणता चांगलाच वाढला..
तेवढ्यात हरी भाऊंची कॉमेंट: उद्या सकाळ मध्ये बातमी.. अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची तारांबळ उडाली...
मग काय बघायलाच नको.. रत्यावर दिसेल त्याच्या/तिच्यावर कॉमेंट मारणं चालू झाला..
लोक आपले सैरा वैरा धावत होते.. बाईक्स आणि स्कुटी वरील नव युवक युवती.. पावसाचा आनंद घेत चिंब भिजून.. फिरत होते..
तेवढ्यात एक लहान पोरांची टोळकी आली.. मे महिन्याचा सुट्ट्या चालू आहेत.. संध्याकाळी क्रिकेट चा टायिम आणि पाऊस आला.. आता करणार काय..
रत्याच्या बाजूने वाहणाऱ्या पाण्यात मस्त उड्या मारत होते.. त्यातीलच एक मुलगा.. त्याच्या पेक्षा छोट्या (वयाने आकाराने नव्हे ) मुलाला : ते बघ.. त्या गाडी चे अर्धे चाक पाण्यात .. त्याला छोट्या मुलाचे उत्तर : आई शप्पत कसलं भारी राव..
हरया आणि मी : हा हा हा हा ..
मग एक कार येते.. टपरी समोर थांबते.. २ डोसा .. अशी ऑर्डर देते..
या वर कॉमेंट हरी भाऊ: आयला, एवढ्या पावसात रत्यावर उभं राहून चहा पिण्याची मजा या कार वाल्यांना नाही येणार..
हरया आणि मी : हा हा हा हा ..
थोड्या वेळाने २ कॉलेज वयीन चिंब भिजलेल्या मुली.. स्कुटी भर रस्त्यात ( त्यांच्या साठी कदाचित ते नवीन नसावा): २ डोसा पार्सल
अशी ओर्देर देऊन गप्पा मारत होत्या.. मागून त्याच्या अजून २ मैत्रिणी आल्या आणि तश्याच रस्त्यावर गप्पा मारत उभ्या राहिल्या..
मागून येणाऱ्या कार ने होर्न वाजवला तेव्हा भानात येऊन.. : अच्चा चाल भेटू उदया
हरया आणि मी : परत हा हा हा हा ...
आत्ता पर्यंत बराच पाऊस पडून झाला होता.. म्हणजे इतका कि आमच्या समोरच्या रस्त्या वर बरच पाणी साठलं होत..
मग एक नाव तरुण त्याच्या जोरात धावण्र्या बाईक वर जरा जोरात आला..समोरून येणाऱ्या रिक्षा मध्ये पाणी उडालं आणि पासिंजर: अरे एsss
करत ओरडला..
हरया आणि मी : हा हा हा हा ...
अजून पण बरेच काही झाला.. बरीच भिजलेली लोकं रस्त्यावरून गेली.. प्रत्तेकावर मारलेले कॉमेंट्स इथे लिहिणं चांगला "दिसणार" नाही..

अश्यातच अर्धा तास गेला.. पाऊस थोडा थोडा कमी झाला. आम्ही हिम्मत करून निघालो.. तर एक कार वाला जोरात गेला आणि जोरात पाणी उडवून गेला..
हरया आणि मी: @!#@!$#@#$ आणि ......परत ...........हा हा हा....
धमाल संध्याकाळ..

बाकी सर्व क्षेम...
चुक भूल देणे घेणे,
आपलाच,
~सभ्तर्ष~

Thursday, August 06, 2009

पैसा ये पैसा ....


काही वर्ष झाले एक गोष्ट माला वेळो वेळी खटकत आली आहे आणि आज पुन्हा खटकली..
तसा माझ्या या पोस्ट मधे म्हटल्या प्रमाणे मी कधी लोकांचा विचार करत नाही, पण आज जरा म्हटला करून बघवा.
कुठल्याश्या वेबसाइट वर कुठल्यातरी software professionals ने केलेल्या घोळा बद्दल बातमी होती.. बातमी तशी चांगली नव्हती, तर त्या बातमी ला येणार्या कमेंट्स वाचल्या तर बातमी बद्दल तर सोडाच पण एकुण software professionals हे किती वाईट अणि माजलेले प्राणी आहेत अणि त्यांचा माज हा किती प्रमाणात समाजाची हानि करतो आहे अणि आपली मराठ्मोळी संस्कृति अस्तास कशी येत आहे, यांना भरपूर पैसे मिळतातम्हणुन हे लोक माजतात अणि गाड्या काय उडवतात, मॉल्स मधे पैसे काय उडवतात, उड़वा उडावी ची उत्तर कायदेतात :P,(बराच उड़ताय ) वगेरे वगेरे कमेंट्स वाचायला अणि बर्याच वेळा ऐकायला मिळतात... तसे काही माजले असतीलही पण ठीके यार कुठली पीढी अशी झाली आहे की ज्यांना त्यांचा काळ झेपला॥ हिटलर ही गाँधी'न च्याच पिढितल..

खर पाहता हे कमेंट्स कराणार्यानचे पण कोणी तरी या IT profession मधे असतीलच, त्यांचा झालेला बर हे दिसत नसावा कदाचित... कुणास ठाउक... हे दर वेळी खर असेलच असा नाही पण माला यालोकांची mentality कळत नाही.
अरे बाबा आमची चुक आहे का की आम्हाला एवढा (जो काय असेल तो... आता तुम्ही त्याला जास्त म्हणता... तसा आम्हाला तो कमीच वाटतो॥ हा माज नव्हे :प) पगार मिळतो आहे....
आता जगाचा नियमच आहे "जो ज्यादा बिकता है उसका दाम भी ज्यादा चुकाना पड़ता है", सद्य परिस्तिथि अशीआहे की आहे जरा डोक्याला भाव... जो उत्तम वापरतो त्याला चांगले मिळतात जो नाही वापरत तो पडतो तसाच.. तसा Darwin च्या evolution theory सारखाच आहे... एके काळी म्हणे mechanical engg ची चलती होती तेव्हात्यांच्या आधीच्या पिढीने हेच केले असावे कदाचित.. कुणास ठाउक... कदाचित पुढल्या पीढी ला काहीतरी नविनसापडेल अणि तेव्हा त्यांना ही त्या वेळी प्रमाणे चैनित रहता यईल एवढा पगार मिळेल.. अणि अत्ता जी माजलेलेम्हणुन संबोधले जात आहेत ते उद्या कदाचित संपूर्ण बदला घेतील अणि तासाचा पुढे चालत राहिल...
चलायाचाचअसा म्हणुन पुढे चालत रहायचा अणि काय....
अरे बाबा तुम्ही एक विसरता आहात जेव्हा असा म्हटला जाता की IT वाल्यांना एवढा पगार वगेरे वगेरे.. तेव्हा हा पण विचार करा की बाबा हे लोक काम काय, किती, केव्हा, केवढा वेळ, कसा करतात.. का यांना एवढापगार दिला जातो..
सगलेच लोक काही IT वल्यां बद्दल असा विचार करतात अस नाही बरेच लोक हे सगळ समजुन ही आहेत.. पणकाय आता.. चलायाचाच....
हे अणि अशेच काही विचार डोक्यात घोळत होते , म्हणुन म्हटला जरा उतरवून टाकावा एखाद्या पानावर... तसा माला कोणा बद्दल काही राग नाही की लोभ नाही.. पण जरा वाटला लिहावासा म्हणुन..

बाकी सर्व क्षेम...
चुक भूल देणे घेणे,
आपलाच
~सभ्तर्ष~

Monday, June 15, 2009

कुछ तो लोग कहेंगे, लोगो का काम है कहना

एकदा एक माणुस साधारण चाळिशीतला अणि त्याचा मुलगा साधारण वय पंधरा- अठरा वर्ष, एका गावातूनदुसऱ्या गावी चालले होतेत्यांच्या बरोबर त्यांचे एक गाढव होते, अशी ही दोघे आपल्या वाटेने छान गप्पा मारतचालले होते
ते एका गावाच्या वेशी पाशी आलेतिथे एक चव्हाट्यावर काही म्हातारी माणसा विड्या फुकत बसली होती, तेत्या दोघांकडे बघून हसायला लागलेत्यातला एक जण दुसऱ्याला म्हणाला "काय म्हणावा या दोघस्नी, गाढवरिकामाच सोडलय अणि बजुना चालत चालली, बसल की नाय एखादा त्या गाढवावर" अणि हसायला लागले... हेत्या दोघांनी ऐकल, मग बाप पोराला म्हणाला की तू बस याच्या वर, पोराने मान डोलावली अणि चढला गाढवावर

दुपारची वेळ होती सूर्य चांगलाच तळपत होता, जाता जाता त्यांना गावात एक नदी लागली म्हणुन थोड़ा पाणीप्यायला म्हणुन दोघे नदी कड़े जायला लागलेतिथे कही बाया कपडे धुवायला आल्या होत्याहे दोघ पाणीप्यायला आलेल्या बघून त्यांच्यात कुजबुज उठली, त्या दोघांच्या कानावर ती यईल एवढ्या जोरात ती चाललीहोतीत्या घोळक्या मधली एक बाई म्हणाली "काय बाबा म्हणायचा या पोरालाएवढा तरण बांड अणि बापालाउन्हातुन चालवतो अणि स्वतः ऐटित या गाढवावर बसलाय"
ते दोघे पाणी प्याले, गाढवालाही पाजले अणि मग पोरगा त्याच्या बापाला म्हणाला, की "आता तुम्ही बसा मीचालतो..."
असेच थोड़ा वेळ चालत असता ते एका चावडी पाशी आले, तिथे काही रिकामी टालकी दुपार जेवण अटपुन पानतम्बाकू खात बसली होती, आडकित्यात सुपारी तोडत तोडत एकाने त्यांच्या कड़े पाहिले... अणि चुक्चुकयालालागलाते पोर-बाप जवळ आल्यावर तो त्याच्या साथीदाराला म्हणाला "काय म्हणावा या बापाला, याचा जीवपण कसा झाला पोराला भर दुपार च्या उन्हात चालवायला" अणि कट कन सुपरीचा तुकडा तोडलादूसरा लगेचपानाला चुना लावता लावता म्हणाला " काय बाबा म्हणायचा या माणसाला, दगडाचा कालीज घेउन आला वाटताजन्माला"
ही वाकया ऐकून बाप हादरलाच, पोरगा पण बापाकडे बघून सांगू इच्छित होता की माझ्या मनात असा काहीनाहीये, पण मग रहावाला नाही म्हणुन बापच नंतर म्हणाला " ये पोरा तू पण बैस याच्यावर"
अणि हळु हळु ते गाढव पुढे सरकू लागला.
पुढे एका देवळा जवळ ते पोचलेतिथे काही मंडळी काही गहन चर्चा करत बसले होतेया दोघांना त्या गाढवावरबसून येताना बघून त्यातून एक जण त्यांनाच म्हणाला की " अरे त्या मुक्या जनावारावर किती अत्याचारकरणार, दोघ दोघ बसून चललासाकाही दाया येते की नाही त्या बिचार्या जनावाराची" हे ऐकून ते बाप-पोर पुन्हा हदारलेचदोघ पटकन खाली उतरले अणि आता काय करायचा, त्या गाढवाला झालेल्या श्रमाच्या परतफ़ेडी खातरत्यांनी ठरवला की ते त्याला उचलून नेणारत्यांनी त्याला उचलले अणि घेउन जायला लागले, बरेच कष्ट पडतहोते, पण तरीही लोकां कडून होणारी कुचबना टालावी म्हणुन ते हे कष्ट घेऊ लागले
थोड़ा वेळ झाला गाव कधीच मागे पडला होत त्यांच गाव आता थोड्याच अंतरावर होत, दुपारचा सूर्य पश्चिमे कड़ेझुकयाला लागला होता, अणि शेतावारून कष्ट करून घरी परताणार्या कही शेताकर्यान्नी त्यांना पहिला
ते हसून हसून लोट पोट झालेत्या बापने त्यांना विचारले काय झाला म्हणुन तर एक जण म्हणाला "अर त्यालास्वताहाचे चार पाय असुनही तुम्ही त्याला कशाला उचलला आहेत्यों चालेल की सोताच्या पायांनी"
आता मात्र फार झालेदोघांनी त्या गाढवाला खली ठेवले अणि गप गुमान चालू लागले

कोणी तरी म्हणुन गेलेच आहे म्हणा " ऐकावे जनाचे अणि करावे मनाचे"

आपलाच,
~सभ्तर्ष~